Friday, October 23, 2026
spot_img
Home चिपळूण रावळगाव येथे २३ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

रावळगाव येथे २३ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

चिपळूण:- तालुक्यातील रावळगाव सुर्वेवाडी येथे एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घराच्या पडवीत गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अमिषा अरविंद सुर्वे (वय २३ वर्षे, रा. रावळगाव सर्वेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या पूर्वी अमिषा सुर्वे हिने रावळगाव सर्वेवाडी येथील स्वतःच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये अज्ञात कारणावरून गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर मृतदेह विच्छेदनासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. कामथे उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चिपळूण पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू (रजिस्टर क्र. ६२/२०२६) अशी नोंद केली आहे. तरुणीने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.