Saturday, September 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १२ विशेष ट्रेन

दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १२ विशेष ट्रेन

रत्नागिरी:- कोकण रेल्वेवर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोकण रेल्वे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो जादा ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. आता दिवाळीत प्रवाशांची, पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन १२ विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवाळी सण २०२६ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन काही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक ०६०१३ / ०६०१४ तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन साप्ताहिक विशेष गाडी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून दर बुधवारी म्हणजेच २१/१०/२०२६, २८/१०/२०२६, ०४/११/२०२६, ११/११/२०२६, १८/११/२०२६ आणि २५/११/२०२६ रोजी सकाळी ०७.४५ वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी ११.०० वाजता मदार जंक्शन येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०६०१४ मदार जं. – तिरुअनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक स्पेशल मदार जंक्शन येथून दर शनिवारी म्हणजेच २४/१०/२०२६, ३१/१०/२०२६, ०७/११/२०२६, १४/११/२०२६, २१/११/२०२६ आणि २८/११/२०२६ रोजी २१.४० वाजता सुटेल. ही ट्रेन चौथ्या दिवशी ००.४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचेल.

विशेष ट्रेनचे थांबे

कोल्लम जंक्शन, कायनकुलम, मावेलीकारा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, चांगनासेरी, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिसूर, शोरानूर जंक्शन, तिरूर, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड, मंगळुरू जंक्शन, सुरथकल रोड, उडुपी रोड, कुंदापुरा, मोकंबिका रोड बायंदूर, मुर्डेश्वर, कुमठा, कारवार, मडगाव जं., थिवी, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा जं., गोध्रा जंक्शन, मंडसोर, निमाच, चित्तौरगड, भिलवाडा, बिजाईनगर आणि अजमेर जंक्शन या स्थानकांवर थांबेल.