Thursday, September 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पालकर फाऊंडेशनमधून ५० हजारांची चोरी

पालकर फाऊंडेशनमधून ५० हजारांची चोरी

संशयितावर गुन्हा दाखल

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील विघ्नवली माळवाडी येथील पालकर फाऊंडेशनच्या काउंटरमधून ५० हजार २०० रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पालकर फाऊंडेशनचे व्यवस्थापक श्रीकृष्ण धोंडु पालेकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फाऊंडेशनच्या ज्येष्ठ नागरिक विभागात एकूण ७८ हजार ८०० रुपये जमा झाले होते. त्यापैकी ५० हजार २०० रुपयांची रक्कम राकेश एकनाथ मेस्त्री याने काउंटरमधून चोरून नेली. चोरीला गेलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या १०० नोटा आणि २०० रुपयांच्या एका नोटेचा समावेश आहे.

चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून २२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी राकेश मेस्त्री याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३ व ३०६ तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.