Tuesday, September 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जयगड सडेवाडीत घरातील सोन्याचे दागिने लांबवले

जयगड सडेवाडीत घरातील सोन्याचे दागिने लांबवले

रत्नागिरी:- जयगड परिसरातील सडेवाडी येथे टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या एका व्यक्तीने फिर्यादीच्या नकळत कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान सडेवाडी, जयगड येथील सौ. तेजस्विनी संकेत वाघधरे (वय ३५) यांच्या घरात ही घटना घडली. आरोपी निलेश नारायण पाटील (वय ४५, मूळ रा. कोळंबे, सध्या रा. सडेवाडी जयगड) हा १३ ते १७ ऑगस्ट दरम्यान फिर्यादीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी आला होता. याच संधीचा फायदा घेऊन त्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय कपाटातील बॉक्समधील ९२,५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले.

​या प्रकरणी फिर्यादी सौ. तेजस्विनी वाघधरे यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी निलेश नारायण पाटील विरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गु.र.नं. ७४/२०२६ गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.