Friday, September 18, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध

झरेवाडीतील तरुण पोलीस कोठडीत

रत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि लग्नाला नकार दिल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. साहिल प्रवीण कळंबटे (वय २७, रा. झरेवाडी, गोताडवाडी) असे आरोपीचे नाव असून, त्याला गुरुवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

आरोपी तरुणाने पीडित तरुणीशी मैत्री करून जानेवारी आणि मार्च महिन्यात तिला गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी नेले होते. तेथील एका लॉजवर नेऊन लग्नाचे आगोद गोड बोलून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि यादरम्यान तरुणीचे नग्नावस्थेतील फोटोही काढून घेतले.

तरुणीने वारंवार लग्न करण्यासाठी तगादा लावला असता, तरुणाने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित तरुणीने जयगड सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, विशेष सहाय्यक सरकारी वकील निलांजन नाचणकर यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, तरुणीचे काढलेले नग्न फोटो हस्तगत करण्यासाठी तसेच या गुन्ह्यात इतर कोणाचे सहकार्य आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी साहिल कळंबटे याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.