दापोली:- तालुक्यातील हर्णे वाकडी भेंड येथे समुद्रकिनाऱ्याजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. आज, २५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास ही घटना किनाऱ्यालगत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.
समुद्रकिनाऱ्याजवळ मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेण्याची तसेच त्याची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.









