Friday, August 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी नाचणे येथे भरधाव रिक्षाच्या धडकेत महिला गंभीर जखमी

नाचणे येथे भरधाव रिक्षाच्या धडकेत महिला गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-नाचणे मार्गावर भरधाव वेगात चालवलेल्या रिक्षाने पुढे चाललेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास नाचणे ते नारायणमळी जाणारे रोडवर, कोहिनूर एन्क्लेव्ह अपार्टमेंटसमोर (गाव नाचणे, ता. जि. रत्नागिरी) घडला. संशयित राजेंद्र दत्तात्रय कुर्टे (वय ५३, रा. आंबेशेत कुर्टेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच- ०८- इ ४१६६) यामध्ये त्यांच्या पत्नी सौ. श्रुती राजेंद्र कुर्टे यांना बसवून नाचणे-नारायणमळी मार्गे आंबेशेत येथे जात होते. दरम्यान, रस्त्याची व रहदारीची परिस्थिती लक्षात न घेता त्यांनी आपली रिक्षा अतिशय हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवली. याच मार्गावर त्यांच्या पुढे सुझुकी एक्सेस दुचाकी (क्र. एमएच ०८ – एवाय ३६६६) घेऊन चाललेल्या साक्षीदार अन्वी अमेय घोसाळे यांच्या वाहनाला रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात अन्वी अमेय घोसाळे (वय ३०, रा. घोसाळेवाडी आंबेशेत) या दुचाकीस्वार महिला असून, अपघातात त्यांच्या डोक्यास व खांद्यास गंभीर दुखापत झाली आहे. तर श्रुती राजेंद्र कुर्टे (वय ५२) व ३) राजेंद्र दत्तात्रय कुर्टे (वय ५३) हे दोघेही रिक्षातील असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी आशिष अरुण घोसाळे (वय ४४, व्यवसाय वकिली, रा. घोसाळेवाडी आंबेशेत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६२/२०२६, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(ए), १२५(बी) आणि मोटार वाहन अधिनियम कलम १८४ प्रमाणे दिनांक ६ ऑगस्ट रोजी रात्री ११:१२ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.