Wednesday, July 29, 2026
spot_img
Home दापोली दुचाकी नाल्यात कोसळून तरुणीचा मृत्यू

दुचाकी नाल्यात कोसळून तरुणीचा मृत्यू

दापोली-खेड महामार्गावर भीषण अपघात

दापोली:- दापोली-खेड महामार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. दापोलीकडून खेडच्या दिशेने जाणाऱ्या दोन तरुणींच्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची गाडी रस्त्याकडच्या नाल्यात कोसळली.

या भीषण दुर्घटनेमध्ये २२ वर्षीय सेजल पांडुरंग भागवत हिचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी तरुणी वैष्णवी चंद्रकांत अहिरे ही जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिकांनी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रयत्न करून एका तरुणीला बाहेर काढले. याशिवाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

दरम्यान, या मार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम, मोऱ्यांजवळ साचलेला गाळ आणि पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही जोर धरत आहे.