Monday, September 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राधाकृष्ण टॉकीज येथील मटका जुगारावर पोलिसांचा छापा

राधाकृष्ण टॉकीज येथील मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील राधाकृष्ण टॉकिजच्या एका टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दूल गफार इस्माईल वल्ली (वय ६५, रा. चांदेराई, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) दुपारी दीडच्या सुमारास राधाकृष्ण टॉकीज जवळ निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अब्दूल वल्ली हा विनापरवाना मटका जुगार खेळ खेळवत असताना सापडला. त्यांच्याकडून साहित्यासह १ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश शेट्ये यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.