खेड:- तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीच्या विनयभंगाप्रकरणातून पुंडलिक शिवाजी केंद्रे या संशयितास न्यायालयाने अटी व शर्थीसह जामिन मंजूर केला. ६ जुलै २०२६ रोजी संशयिताने एका अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी त्याला अटक केली होती.
संशयिताच्या वतीने ॲड. अनुजा गणेश राऊत यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाले असता ॲड. राऊत यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत जामिन मंजूर करण्यात आला आहे.









