Friday, July 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गोळप येथे दोन सोन्याच्या अंगठ्यांची चोरी; घरकाम करणाऱ्या महिलेवर गुन्हा

गोळप येथे दोन सोन्याच्या अंगठ्यांची चोरी; घरकाम करणाऱ्या महिलेवर गुन्हा

रत्नागिरी:- कुंभारवाडी गोळप सडा येथे घरातील बेडरुममधून सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश शंकर साळवी (वय ६०, व्यवसाय-व्यापार, रा. गोळप कुंभारवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

०२ एप्रिल सकाळी १० वाजल्यापासून ते १० एप्रिल रात्री ९ वाजेपर्यंत फिर्यादी यांचे राहते घर, बेडरुम, कुंभारवाडी गोळप सडा येथे चोरीची घटना घडली आहे. २३ जुलै रोजी रात्री ७ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (क) नुसार घरकाम करणाऱ्या​संशयित सविता नरेंद्र गावडे (रा. कुंभारवाडी सडा, ता. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

​फिर्यादी यांच्या घरातील बेडरुममधील बेडवर काढून ठेवलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या संशयिताने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरल्या आहेत. ज्यामध्ये १० ग्रॅम वजनाची, नवग्रहाची सोन्याची अंगठी व१० ग्रॅम वजनाची, त्यावर आडव्या रेषा असलेली चौकोनी डिझाईनची सोन्याची अंगठी असा एकूण ८०,००० रुपयांचा माल चोरीस गेलेला आहे

​फिर्यादी यांच्या घरी घरकामासाठी असणारी संशयित महिला सविता नरेंद्र गावडे हिला फिर्यादी आपली मुलगी मानत होते. ती स्वतःहून सोन्याच्या अंगठ्या परत आणून देईल, असा विश्वास वाटल्याने फिर्यादी यांनी पोलिसात खबर देण्यासाठी उशीर केला.