रत्नागिरी:- शहराजवळील शिरगाव पूलाच्या पुढे बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत मुरलीधर शेट्ये (वय ३९, रा. शेट्येवाडी, शिरगाव, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास शिरगाव पुल येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित विनापरवाना मटका-जुगार चालवत असताना सापडला. त्यांच्याकडून पोलिसांनी मटका जुगाराची रक्कम जप्त केली. या प्रकरणी पोलिस हवालदार आशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









