Tuesday, July 14, 2026
spot_img
Home राजकीय हर्षराज पाटील यांची युवासेना रत्नागिरी तालुका प्रमुखपदी नियुक्ती

हर्षराज पाटील यांची युवासेना रत्नागिरी तालुका प्रमुखपदी नियुक्ती

रत्नागिरी:- शिवसेना पक्षाच्या युवासेना रत्नागिरी तालुका प्रमुख पदी हर्षराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सचिव (कोकण विभाग) व महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य विकास भरतशेट गोगावले यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच युवासेना सरचिटणीस पूर्वेशभाई सरनाईक यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार ही जबाबदारी हर्षराज पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून, शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन ते कार्यरत राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे
आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हर्षराज पाटील यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हापरीषद सदस्य बाबू म्हाप, युवासेवा जिल्हाप्रमुख (दक्षिण) तुषार साळवी, पंचायत समिती सदस्य वैभव पाटील, तात्या सावंत, प्रथमेश पाटील, बारक्याशेठ हळदणकर, पंकज झगडे यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. हर्षराज पाटील यांनी यापुर्वी मिरजोळे विभागप्रमुखपदी काम केले होते. या भागामधील युवकांना एकत्रित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. त्यांच्या याच कामाची दखल घेत युवासेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.