Monday, June 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी रिमांड होम नजीक अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी रिमांड होम नजीक अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील रिमांड होमच्या समोरील जंगलमय भागात अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अब्दूल्ला अलिमिया बारगीर (वय ४२, रा. केळ्ये, मजगाव-म्हामूरवाडी, रत्नागिरी) असे अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २०) सायंकाळी सातच्या सुमारास रिमांड होम समोरिल जंगलमय भागात निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अब्दूल्ला बारगीर हा अमली पदार्थाचे सेवन करत असताना सापडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण खांबे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.