Monday, June 15, 2026
spot_img
Home संगमेश्वर संगमेश्वर स्थानकात बसच्या बॅटरीचा स्फोट

संगमेश्वर स्थानकात बसच्या बॅटरीचा स्फोट

संगमेश्वर:- ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य अभिमानाने मिरवणाऱ्या आणि “आम्ही प्रवाशांच्या सेवेला नवीन टकाटक गाड्या आणल्या आहेत,” असा गाजावाजा करणाऱ्या एसटी महामंडळाचा आणखी एक भोंगळ कारभार रविवारी रात्री संगमेश्वर स्थानकातमध्ये चव्हाट्यावर आला आहे. एका बसच्या बॅटरीचा स्पोर्ट झाला, अन प्रवाशांची धांदल उडाली.

देवरुख आगाराच्या एका लांब पल्ल्याच्या बसच्या बॅटरीचा संगमेश्वर आगारातच रात्री साडेआठच्या सुमारास प्रचंड मोठा, कानठळ्या बसवणारा आवाज झाला. या आवाजाने संपूर्ण आगार हादरून गेले आणि प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली . महामंडळाच्या या निकृष्ट दर्जाच्या देखभालीमुळे आणि संगमेश्वर स्थानकातील तांत्रिक व्यवस्थेच्या दिवाळखोरीमुळे प्रवाशांना फटका बसत आहे.

रविवारी रात्री संगमेश्वर आगार परिसर प्रवाशांनी खचाखच भरलेला होता. देवरुख आगाराची एम.एच. १४ एल.एक्स. ७१४२ ही ‘देवडे ते बोरिवली’ जाणारी गाडी आगारात उभी होती. अचानक या गाडीतून प्रचंड मोठा आवाज झाला. आवाज इतका भयानक होता की, भयभीत झालेले प्रवासी एसटी बस मधून भयभीत होऊन बाहेर पडू लागले. तर आजूबाजूचे लोक व आगारात बसलेले प्रवासी आवाजाच्या दिशेने धावू लागले. या वेळी बसच्या बॅटरी कक्षातून प्रचंड धूर आणि रासायनिक पाणी बाहेर फेकले जात असल्याचे दिसून आले.

सुदेवाने हा प्रकार गाडी आगारात उभी असताना घडला.तर पुढचे तर्क वितर्क यावेळी उपस्थिता कडून लढवळे जात होते. आणि तसे तशी काही दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतली असती का? असा संतप्त आणि आक्रमक सवाल आता जनता विचारत आहे.

हा स्फोट झाला तेव्हा बसचे चालक आणि वाहक नियंत्रण कक्षात नोंद करण्यासाठी गेले होते. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जीवाची पर्वा न करता तात्काळ बॅटरीचा कक्ष उघडला आणि मुख्य सप्लाय कीट बाहेर काढला, ज्यामुळे पुढील भीषण संभाव्य घटना टळली. स्फोट इतका तीव्र होता की बॅटरीच्या भागाचे तुकडे झाले.