Friday, May 29, 2026
spot_img
Home रत्नागिरी कोळंबेत दुचाकीवरुन जाताना अपघात; महिला गंभीर जखमी

कोळंबेत दुचाकीवरुन जाताना अपघात; महिला गंभीर जखमी

रत्नागिरी:- मानखुर्द-मुंबई येथील शहरातील पेठकिल्ला येथे आलेल्या कुटुंबातील एका महिलेचा कोळंबे येथे जात असताना दुचाकीवरुन पडून अपघात झाला. यामध्ये त्या गंभीर झाल्या. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौ. विद्या संतोष लाखण (वय ४८, रा. मानखुर्द-मुंबई) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २८) दुपारी सव्वाच्या सुमारास श्री त्रिमुखीमंदिर लक्ष्मीकेशव नगर रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेचे पती संतोष सुर्यकांत लाखण हे दुचाकी (क्र. एमएच-०८ बीएम ००४७) वरुन जयस्तंभ ते कोळंबे असे जात असताना लक्ष्मीकेशव नगर येथे दुचाकी स्लिप झाली आणि त्यांची पत्नी विद्या लाखण या पडल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.