रत्नागिरी:- शहरातील तेली आळी येथील किरणा दुकांनाच्या समोर पुर्ववैमनस्यातून मारहाण झाली. स्टिलच्या कड्याने दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अमन म्हापुसकर (पुर्ण नाव पत्ता माहित नाही, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास तेली आळी येथे गोविंद शेठ यांच्या किराणा दुकानाजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राकेश गोविंद मकाने (वय १९, रा. खालची आळी, रत्नागिरी) हे व संशयित अमन म्हापूसकर एकमेकांचे आळखीचे होते. २०२५ ला गणपती विसर्जनाच्यावेळी मांडवी रत्नागिरी येथे या दोघांमध्ये वाद झाला होता. तो सामजस्याने मिटला होता. सोमवारी रात्री फिर्यादी व त्यांचा मित्र पार्थ ठाकूर यांच्यासोबत गोविंद शेठ यांच्या किराणा दुकानात खरेदी साठी गेले असता ते दुचाकवर बसले असताना संशयित अमन म्हापुसकर याने हातातील स्टीलच्या कड्याने फिर्यादी राकेश मकाने यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. पार्थ ठाकूर यांने त्यांची भांडणे सोडवली. संशयित अमन याने पुन्हा तुला ठार मारेन अशी धमकी दिली. जखमी राकेश मकाने याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. पोलिस हवालदार गणपत झोरे यांनी या प्रकरणी जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदविली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









