Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरीत अंमली पदार्थांवर पोलिसांचा छापा

रत्नागिरीत अंमली पदार्थांवर पोलिसांचा छापा

६६ हजारांच्या ‘ब्राऊन शुगर’सह तरुणाला अटक

रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ६६ हजार रुपये किमतीचे ५.५ ग्रॅम ‘ब्राऊन हेरॉईन’ (ब्राऊन शुगर) जप्त करण्यात आले असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​बुधवार, १ मे रोजी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास कोकणनगर परिसरातील साईभूमिनगर अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला एक तरुण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.
​या कारवाईत आरमान लियाकत धामस्कर (वय २७, रा. साईभूमिनगर, जे.के. फाईल, रत्नागिरी) हा तरुण संशयास्पद रित्या मिळून आला. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले ५.५ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन सदृश्य अंमली पदार्थ सापडले.

या कारवाईत सुमारे ६६,००० रुपये किंमचीचे ५.५ ग्रॅम निव्वळ वजन असलेले ब्राऊन हेरॉईन जप्त करण्यात आला. ​यासोबतच अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेली प्लास्टिकची पिशवीही पोलिसांनी जप्त केली आहे.

​याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद शंकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आरमान धामस्कर याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ च्या कलम ८ (क) आणि २१ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.