Thursday, June 11, 2026
spot_img
Home Blog क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या बहाण्याने खंडाळा येथील प्रौढाला २७ लाखांचा गंडा

क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या बहाण्याने खंडाळा येथील प्रौढाला २७ लाखांचा गंडा

दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- फेसबुक या सोशल मिडीयावर ओळख वाढून क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून तरुणीने आपल्या मित्राच्या मदतीने गुहागर येथे नोकरी निमित्त आलेल्या हरियाणा येथील प्रौढाची तब्बल 27 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. फसवणूकीची ही घटना 26 मार्च ते 16 एप्रिल या कालावधीत तवसाळ-गुहागर येथे घडली आहे. याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  आदिती शर्मा आणि अंकित शर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात विनय कुमार सिन्हा (48,मुळ रा.गुडगाव, हिरयाणा सध्या रा.खंडाळा,रत्नागिरी) यांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, आदिती शर्मा या मुलीने फेसबुकवर फिर्यादीशी ओळख निर्माण केली. ती फिर्यादीशी फेसबुक मेसेंजर व व्हॉटसॲपवर बोलत असताना तिने त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीला क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून तिचा साथिदार ब्रोकर अंकित शर्मा याचा मोबाईल नंबर दिला. अंकितने फिर्यादीला आपण सिनिअर फॉर्जन एक्सेंज ट्रेडिंग कन्सल्टंट असल्याचे सांगून दोन्ही संशयितांनी फिर्यादीला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने 26  लाख 76 हजार 941 रुपयांची गुंतवणूक केली. परंतू मुदत संपल्यावर फिर्यादीने ते पैसे विथड्रॉवल करण्याचा वारंवार प्रयत्न केला असता त्याला पैसे परत मिळालेले नाहीत. तसेच दोन्ही संशयितांनी फिर्यादीला कोणताही प्रतिसाद दिला नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शनिवार 25 एप्रिल रोजी गुहागर पोलिस ठाण्यात धाव घ्ोत तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास गुहागर पोलिस करत आहेत.