Wednesday, June 10, 2026
spot_img
Home खेड कळंबनी येथे फॉर्च्युनर हॉटेल अन् घरात घुसली

कळंबनी येथे फॉर्च्युनर हॉटेल अन् घरात घुसली

भीषण अपघातातून मोठी जीवितहानी टळली, हॉटेलचे नुकसान

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबनी येथे आज एका भरधाव फॉर्च्युनर कारने हॉटेल आणि घराला जोरदार धडक दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. हा अपघात कळंबनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अगदी समोरच घडला असून, यामध्ये कारसह दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तिथे कोणीही नसल्याने एक मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर फॉर्च्युनर कार मुंबईच्या दिशेने जात होती. कळंबनी परिसरात आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेल व घरात शिरली. ही धडक इतकी भीषण होती की हॉटेलच्या दर्शनी भागाचे आणि आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचा भीषण आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. ‘दैव बलवत्तर’ म्हणून या भीषण अपघातात सुदैवाने कोणालाही गंभीर इजा किंवा दुखापत झालेली नाही, मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावर अशा प्रकारे कार थेट घरात शिरल्याने वाहनचालकांच्या वेगावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खेड पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत असून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सध्या सुरू आहे.