Wednesday, June 10, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरीत शेअर मार्केटच्या नावाखाली ९० लाखांचा गंडा

रत्नागिरीत शेअर मार्केटच्या नावाखाली ९० लाखांचा गंडा

रत्नागिरी:- शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका कुटुंबाची ९० लाख १ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे येथील एका तरुणाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​महमद अवाद अजीज वागळे (वय २१, रा. ओसवालनगर, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महमद आणि त्यांच्या वडिलांना आरोपी फैजान नस्दीन शेख (वय २५, रा. अमृतनगर, जि. ठाणे) याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची गळ घातली होती. चार महिन्यांच्या एका विशेष योजनेची माहिती देऊन, त्यात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते.

​आरोपीच्या आमिषाला बळी पडून फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांनी ४ नोव्हेंबर २०२४ ते ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत वेळोवेळी एकूण ९०,०१,३०० रुपये आरोपीकडे सोपवले. ही रक्कम काही प्रत्यक्ष घरी तर काही ऑनलाइन पद्धतीने देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही आरोपीने कोणताही परतावा दिला नाही. वारंवार मागणी करूनही गुंतवलेली मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे वागळे कुटुंबाच्या लक्षात आले.

​या मोठ्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी १८ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी फैजान शेख याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१८(२) आणि ३१८(४) (फसवणूक) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.