रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथे एका ट्रान्स्पोर्टच्या समोर उभी केलेली मोटार कामातील चालकाने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निसार अब्दूलसत्तार चौगुले (रा. अन्सारी चौक, कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १२) सकाळी दहा ते सायंकाळी साडेसात च्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आदित्य संदेश निकम (वय २२, रा. ज्योतीबा मंदिर पेठकिल्ला-रत्नागिरी) यांनी आपल्या मालकीची गाडी (क्र. एमएच-०८ एएल १९५५) ही आठवडाबाजर येथील स्वामी ट्रान्स्पोर्टसमोर उभी करुन ठेवलेली होती. कामातील संशयित चालक निसार चौगुले यांनी ही मोटार चोरुन नेली. फिर्यादी यांचे वडिल संदेश गुरुनाथ निकम यांनी गाडीचा शोध घेतला मात्र गाडी सापडली नाही याप्रकरणी फिर्यादी आदित्य निकम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









