Monday, May 11, 2026
spot_img
Home लांजा लांजात चार वर्षीय मुलीवर अत्याचार

लांजात चार वर्षीय मुलीवर अत्याचार

विधिसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल

लांजा:- लांजा तालुक्यातील चार वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांनी याप्रकरणी विधिसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल केला आहे.

२३ मार्च रोजी पीडिता खेळत असताना आरोपी विधिसंघर्षित बालक आला. दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान त्याने पीडित मुलीसोबत अत्याचार केला. दरम्यान ही बाब पालकांच्या निदर्शनास येताच त्यांना मानसिक धक्का बसला. त्यांनी पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच संशयित मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.