Wednesday, May 6, 2026
spot_img
Home दापोली दुचाकीवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

दुचाकीवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

दापोली जोगळे खोंडा पाटीलवाडी येथील घटना

दापोली:- शहरातील जोगळे खोंडा पाटीलवाडी येथे दुचाकीवरून पडल्याने खोंडा येथील मेहमूद्दीन मेहबूब मुल्ला या ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १ मार्च रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैनुद्दीन हा १ मार्च रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान जोगळे खोंडा पाटीलवाडी येथे किरण भंडारी यांच्या घरासमोरील सिमेंटच्या पाखाडी रस्त्याच्या बाजूला मोटारसायकलवरून प्रवास करत असताना तोल जाऊन पडला. त्याला किरण भंडारी यांच्या रिक्षाने उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ११.५० वाजता त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.