Monday, May 4, 2026
spot_img
Home गुन्हेगारी आरोग्य मंदिर येथे पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धेची सोन्याची चेन लंपास

आरोग्य मंदिर येथे पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धेची सोन्याची चेन लंपास

रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर येथील बसस्टॉपजवळ एका वृध्द महिलेला पोलिस असल्याची बतावणी करत अज्ञाताने हातचलाखी करत तिच्या गळ्यातील 70 हजारांची सोन्याची साखळी लांबवली. ही घटना मंगळवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.15 ते 9.30  वा. सुमारास घडली आहे.

   याबाबत विजया श्रीकृष्ण सरदेसाई (70, रा.नाचणे पावउ हाउस,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी विजया सरदेसाई या दूध आणण्यासाठी आरोग्य मंदिर परिसरात गेल्या होत्या. त्या आरोग्यमंदिर येथील बसस्टॉपजवळ आल्या असता एक अज्ञात त्यांच्या दिशेने आला. त्याने सरदेसाई यांना आपण पोलिस असल्याची बतावणी करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.