Tuesday, May 19, 2026
spot_img
Home दापोली झाडावरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

झाडावरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील करजगाव जानेश्वरवाडी येथील दत्ताराम जनार्दन नामोळे या ६७ वर्षाचा वृद्धाचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनार्दन नामोळे हे त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या रामफळाच्या झाडावरील रामफळ काढण्यासाठी झाडावर चढले. तेव्हा त्यांच्या पायाखाली असलेली फांदी तुटल्याने ते झाडाखालील जमिनीवर असणाऱ्या काळ्या दगडावर पडले. त्यामध्ये त्यांच्या कोपराला दुखापत होऊन बरगडीला मुका मार लागला होता. प्रथम त्यांना बुरुंडी येथील फाईम डॉक्टर यांच्या कडे व त्यानंतर तलाठी हॉस्पिटल दापोली येथे दाखल केले. तेथून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अंसता वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून मृत घोषित केले.