Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी गयाळवाडी फाटा अपघात प्रकरणी ‘त्या’ डंपर चालकाविरुद्ध गुन्हा

गयाळवाडी फाटा अपघात प्रकरणी ‘त्या’ डंपर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या गयाळवाडीफाटा येथे डंपरने मोटारीला धडक दिली. या अपघातात चार महिला जखमी झाल्या. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठोबा भागाप्पा माने (रा. गुलाबवाटीका अपार्टमेंट-कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे संशयित डंपर चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) दुपारी तीनच्या सुमारास हातखंबा ते रत्नागिरी रस्त्यावरिल खेडशी गयाळवाडी स्टॉप जवळ घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोटार चालक फिर्यादी दिनेश दाजी परकर हे त्यांच्या ताब्यातील मोटार (क्र. एमएच-०७ क्यू ७०६०) त्यांची आई सरोजिनी परकर, पत्नी सौ. मनस्वी दिनेश परकर, वहिनी सौ. मंजिरी मकरंद परकर, बहिण स्वरांगी सुदेश पवार यांना घेऊन आरवली ते हातिस असे जात असताना रविवारी दुपारी तीन च्या सुमारास हातखंबा ते रत्नागिरी खेडशी गयाळवाडी स्टॉप च्या ठिकाणी आले असता रत्नागिरीहून येणाऱ्या डंपर (क्र. एमएच-०८ बीके ४९७७) वरील संशयित चालक विठोबा माने युटर्न घेण्याच्या नादात हातखंबा येथून येणाऱ्या मोटारीला धडक दिली. या अपघातामध्ये चार महिलांना दुखापत झाली. या प्रकरणी दिनेश परकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.