Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कुंबळेत गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

कुंबळेत गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

मंडणगड:- तालुक्यातील कुंबळे येथे गांजांचे सेवन करताना आढळून आलेल्या दोन व्यक्तींविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. देवजी विष्णू पवार (४७,), दिलीप शांताराम पवार (४८, दुधेरे, मंडणगड) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल विनय पाटील यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी कुंबळे येथील बसथांब्याच्या पाठीमागे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास देवजी विष्णू पवार, दिलीप पवार हे दोघे जण एका झाडाच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी गांजासारख्या अमली पदार्थाचे सेवन करताना आढळले. याबाबत त्यांच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.