रत्नागिरी:- सामाजिक व राजकीय क्षेत्रात सदैव सक्रिय सहभाग असलेले शहरानजिकाया शिरगाव-तिवंडेवाडी येथील दीपक नारायण सनगरे यांचे शुक्रवारी पहाटे प्रकृती अस्वस्थतेमुळे अकाली निधन झाले. मृत्यूसमयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने रत्नागिरी शहर व शिरगाव परिसरात शोककळा पसरली असून, शुक्रवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.
शिरगाव तिवंडेवाडी (रत्नागिरी) येथील रहिवासी असलेले दीपक सनगरे यांचे शालेय शिक्षण अ. के. देसाई हायस्कूलमध्ये झाले होते. सामाजिक आणि राजकीय कार्यात सदैव अग्रणी राहत. शिवसेनो शाखाप्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक सार्वजनिक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यां मित्रपरिवार मोठा आहे.
गेल्या काही वर्षांत दीपक यांच्यावर एकापाठोपाठ एक मोठे आघात झाले होते. काही महिन्यांच्या अंतराने त्यांनी आई आणि वडिलांना गमावले. हे धक्के पचवत असतानाच, त्यांच्या पत्नीचेही सुमारे पा महिन्यांपूर्वी अचानक निधन झाले होते. शिरगावाया दिवंगत माजी सरपां वैशाली गावडे-सनगरे यों ते पती होत. मोठय़ा संकटांच्या या मालिकेला खंबीरपणे सामोरे जाण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्यींही अलिकडाया काळात प्रकृती अस्वस्थ बनली होती. शुक्रवारी पहाटाया सुमारास त्यीं तिवंडेवाडी येथील निवासस्थानी प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी शिरगाव येथील स्मशानभूमीत त्यांयावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार यीं उपस्थिती होती. दीपक सनगरे यांच्या निधनाने मित्रमंडळींचे ‘चैतन्य‘ हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यांचे हसरे व्यक्तिमत्त्व, बोलका स्वभाव आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची कला सर्वांनाच कायम आठवण करून देईल. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, बहिणी, भावजय असा मोठा परिवार आहे.









