Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी दुचाकी घसरून अपघात; पती-पत्नीसह मुलगा जखमी

दुचाकी घसरून अपघात; पती-पत्नीसह मुलगा जखमी

मुर्शी वाणीवाडी रस्त्यावरील घटना

रत्नागिरी:- साखरपा (ता. संगमेश्वर) येथील मुर्शी वाणीवाडी रस्त्यावर दुचाकी स्लीप झाली. या अपघातात तिघेजण किरकोळ जखमी झाले. उपचारासाठी साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी आठच्या सुमारास मुर्शी-वाणीवाडी रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वार संतोष धोंडू फोंडे (वय ३४, रा. साखरपा, संगमेश्वर) हे दुचाकी घेऊन दख्खन ते साखरपा असे येत असताना मुर्शी-वाणीवाडी रस्त्यावर त्यांची दुचाकी स्लिप झाली. या अपघातमध्ये संतोष फोंडे व त्यांची पत्नी ही किरकोळ जखमी झाले मात्र सोबत असलेला त्यांचा लहान मुलगा-देवांश याच्या डोक्याला मार लागला. तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय साखरपा येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.