Sunday, May 3, 2026
spot_img
Home खेड नांदगावमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

नांदगावमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगाव येथे रस्त्याच्या बाजूला मंगळवारी सकाळच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळला. अज्ञात वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. अंदाजे ७ ते ८ महिन्याचा असलेला बिबट्या मादी जातीचा असल्याचे सांगण्यात आले.

रस्त्यालगत मृतावस्थेतील बिबट्या निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी ही वनविभागाच्या कानावर घातली. त्यानुसार वनपाल उदय भागवत व पथकाने घटनास्थळी पोहचून रस्त्यालगत पंचनामा केला. बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. भक्ष्याच्या शोधात रस्त्यावरून जात असताना, अज्ञात वाहनाच्या धडकेने धडक बसून त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. मृतावस्थेतील बिबट्याचे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करून विल्हेवाट लावण्यात आली.