पेठकिल्ला येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहराजवळील पेठकिल्ला, भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी अमलीपदार्थ सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हारुन आकलीम सय्यद (वय १८, रा. मजगाव रोड, कोकणनगर रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. ७) रात्री साडेआठच्या सुमारास पेठकिल्ला येथील भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी बॅकवाटर वॉल येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी अमली पदार्थाचे सेवन करताना आढळला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.