देवरुख:- साईनगर-साडवली (ता. संगमेश्वर) येथे घराच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. देवरुख पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ ते रविवारी (ता. २६) सकाळी साडेनऊच्या सुमारास साईनगर-साडवली येथे फिर्यांदीच्या घराच्या कंपाऊंडमधील पार्किंग शेडमध्ये घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रमेश अर्जून गोताड (वय ५५, रा. साईनगर, साडवली, ता. संगमेश्वर) यांनी २५ हजाराची दुचाकी (क्र. एमएच-०८ ए. झेड ३०८०) ही घराच्या कंपाऊंडमधील पार्किंग शेडमध्ये हॅन्डल लॉक करुन ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी रमेश गोताड यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









