Sunday, May 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी मुरुगवाडा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुरुगवाडा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा-झोपडपट्टी येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. इरफान दौला मकाशी (वय ३२, रा. मुरुगवाडा-झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १६) सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इरफान मकाशी याने घरात कुणी नसताना कोणत्यातरी अज्ञात कारणातून छताच्या पाईपला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतला. घरातील मंडळी घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या बाबत शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.