रत्नागिरी:- भक्ती मयेकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दुर्वास पाटीलचा जामिन अर्ज न्यायालयाने बुधवारी नाकारला. दुर्वासने त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे इतर दिवसांचे उत्तरकार्य करण्यासाठी 15 दिवसांच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
दर्शन पाटील हा विर खून प्रकरणातील संशयित होता. न्यायालयीन कोठडीत असताना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर आधी जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू अधिक उपचारांसाठी त्याला मुंबईतील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान त्याचा 30 सप्टेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी न्यायालयाने मुलगा दुर्वास पाटीलला बुधवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीसाठी पोलिस कस्टडीतच उपस्थित राहण्याची मुभा दिली होती.
दरम्यान, संशयित दुर्वास पाटीच्या वकिलांनी त्याचे वडिल दर्शन पाटीलचे सर्व दिवस-वार करण्यासाठी न्यायालयात दुर्वास पाटीलसाठी 15 दिवसांच्या जामिनाची मागणी केली होती. त्याविरोधात सरकारी पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर बुधवार 7 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने दुर्वास पाटीलचा जामिन नाकारला.