रत्नागिरी :- संचारबंदी आणि लॉक डाऊनच्या काळात चोरट्यांचे थांबलेले उद्योग हळूहळू सुरु झाले आहेत. मंगळवारी रात्री शहरातील जयस्तंभ येथे चोरट्यांनी चोरी केली. विशेष म्हणजे यावेळी चोरट्यांनी फ्लॅट मधून इतर काही न नेता चक्क बँकेच्या तिजोरीच्या चाव्या घेऊन पळ काढल्याची घेतली आहे.
रत्नागिरी शहरातील जावकर प्लाझा, जयस्तंभ येथील एक सदनिका फोडून चोरट्याने एका बँकेच्या शटरच्या व लॉकरच्या चाव्या चोरून नेल्याची घटना घडली. या सदनिकेत या बँकेचे मॅनेजर रहात होते. या चाव्या ज्या बॅगमध्ये ठेवण्यात आल्या होत्या ती बॅगच चोरट्याने पळवली. या बॅगेत महत्वाची काही कागदपत्र देखील होती. आता या चोरीमुळे या बँकेचे लॉकर व कुलपं बदलावी लागणार आहेत. या बाबतची फिर्याद संतोष संसारे यांनी शहर पोलीस स्थानकात नोंदवली आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.