रत्नागिरी:- शहरानजीकच्या जाकिमिऱ्या येथील वृद्ध बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेतला असता आलावा-जाकिमिऱ्या येथील समुद्र किनारी पाण्यात बेशुद्ध अवस्थेत सापडले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हेमंत रामचंद्र सावंत (वय ६३, रा. पाराणेवाडी, जाकिमिऱ्या, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १८) सकाळी सव्वानऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमंत सावंत हे बुधवारी (ता. १७) दुपारी बाराच्या सुमारास घरातून निघून गेले होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास आलावा-जाकिमिऱ्या येथील समुद्र किनारी बेशुद्ध अवस्थेत सापडले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.