मोहीम तीव्र करा: एम. देवेंदर सिंह यांची सुचना
रत्नागिरी:- पोलिस, उत्पादन शुल्क, कोस्टगार्ड आणि अन्न औषध प्रशासन विभाग यांनी समन्वयाने अमली पदार्थविरोधी तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या. जिल्ह्यात मागील महिन्यात ९ गुन्हे दाखल झाले असून १५ संशयितांवर कारवाई करण्यात आली असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकरा
नार्को कोओर्डीनेशन यंत्रणेच्या कामकाजावर चर्चा झाली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, पोलिस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्यासह क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
पोलिस निरीक्षक श्री. ढेरे यांनी ७ जुलैपासून अमली पदार्थविरोधी केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. एकूण ९ गुन्ह्यांमध्ये ११ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, ४.५ कि.ग्रॅ. गांजा असा एकूण ३ लाख ५९ हजार ९०० रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला.
शाळा, महाविद्यालयात जनजागृती करा
उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याबाबत निवडणूक कालावधीत जशी चांगली कामगिरी केली आहे, तशी कामगिरी अमली पदार्थाविरोधातही करावी. शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील जनजागृती करण्यावर जिल्हापरिषदेने भर द्यावा, असे जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सांगितले.