वाकवली येथे १ लाख ७० हजाराची चोरी

दापोली:- तालुक्यातील वाकवली येथे सुमारे १ लाख ७० हजार रुपयाची चोरी झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

राकेश प्रकाश घोडेराव (३५ रा. टेटवली सरवदेवाडी) यांनी दापोली पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीचे राकेश मोबाईल नावाचे दुकान घोले हायस्कूल जवळ आहे. या दुकानात काम करत असताना दिपांकर राधा रमण बुटाला (३२ रा. वाकवली) हा मुका असल्याचे भासवत त्याच्या जवळ असणारा मोबाईल रिपेरिंग करण्याच्या बहाण्याने दुकानात आला. दुकानाचे शटर बाहेरून बंद करत असताना संधीचा फायदा घेऊन बुटालाने सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची ३० ग्रॅम वजनाची साखळी व सुमारे २० हजार रुपये किमतीचा मोबाईल खेचून पळून गेला. संशयित आरोपी बुटाला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.