Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चर्चरोड येथे हातभट्टी दारु विक्रीवर छापा

चर्चरोड येथे हातभट्टी दारु विक्रीवर छापा

रत्नागिरी:- शहरातील पालिकेच्या बंद शाळेच्या मागील बाजूस विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४५० रुपयांची चार लिटर दारु जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाझीम अहमद झारी (वय ६५, रा. जामा मशीद जवळ, झारणीरोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) दुपारी अडीचच्या सुमारास आरसीचर्च रस्त्यावर पालिकेच्या बंद शाळेच्या मागील बाजूस निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा विनापरवाना हातभट्टीची दारुची विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.