Saturday, May 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जामनगर एक्स्प्रेसमध्ये १ लाख ७० हजारांच्या दागिन्यांची चोरी

जामनगर एक्स्प्रेसमध्ये १ लाख ७० हजारांच्या दागिन्यांची चोरी

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या जामनगर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशी महिलेच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने १ लाख ७० हजार १० रुपयांची ज्वेलरी चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी आठच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुदलैवादीक अनंता पेरुमाल कोनर (वय ३४, रा. श्री रजा राजश्वरी टेंपल, शेल कॉलनी रोड, साईबाबा नगर, चेंबुर, ईस्ट-मुंबई) या मंगळवारी जामनगर एक्स्प्रेस ने प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान त्या झोपलेल्या असताना चोरट्याने सीट खाली ठेवलेली १ लाख ७० हजार १० रुपयांची ज्वेलरी असलेली बॅंग पळविली. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.