रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप दर्गा येथे काळोखात आपल्याजवळ एक सूरा बाळगून लपून बसलेल्या संशयिताविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 5 ऑगस्ट रोजी रात्री 10 वा.सुमारास करण्यात आली.
रविंद्र भिकाजी जांभळे (62, रा.गोळप कातळवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस नाईक संदीप महाडिक यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,मंगळवार 5 ऑगस्ट रोजी रात्री संशयित हा आपल्या जवळ एक लोखंडी सुरा बाळगून काळोखात ओळख लपवून संशयास्पद हालचाली करत असताना मिळून आला.