बेकायदेशिरपणे गावठी दारु बाळगल्या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यतील सैतवडे येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने आपल्याजवळ बाळगणार्‍या महिले विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2.25 वा.सुमारास करण्यात आली.

जायीदा अन्वर शेखासन (58,रा.बोरसई मोहल्ला सैतवडे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल संतोष शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी ही महिला सैतवडे येथील एका बंद घराच्या बाजुला खाडीकिनारी आपल्या ताब्यात 550 रुपयांची 5 लिटर गावठी दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.