आगवे येथून ३५ हजाराचे लोखंडी अँगल पळविले; अज्ञाता विरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील आगवे येथील कावला आंबा ठेवलेले ३५ हजाराचे लोखंडी अँगल अज्ञात चोरट्याने पळविले. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) दुपारी बाराच्या सुमारास गावचे सरपंच रमेश गुणाजी मालप यांच्या मालकीच्या जमिनीत आगवे-कावला आंबा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवाजिश फरमद अली (वय ३५, रा. जाकादेवी बाजारपेठ, रत्नागिरी मुळ: चंदौरा सिवल मेरठ -उत्तरप्रदेश) यांनी गावचे सरपंच रमेश मालप यांच्या जागेत बीएसएनएल कंपनीचे टॉवरचे काम करत असताना कामाचे ३५ हजार रुपयांचे ९०२ किलो वजनाचे लोखंडी अँगल ठेवले होते. अज्ञात चोरट्याने ते पळविले. या प्रकरणी फिर्यादी नवाजिश अली यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.