रत्नागिरी:- शहराजवळील पेठकिल्ला-लोहार गल्ली येथील झाडा-झुडपाच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८१५ रुपये पोलिसांनी जप्त केले. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राकेश विजय मोरे (वय ४९, रा. मिरकरवाडारोड, उर्दू शाळेजवळ, पेठकिल्ला-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २३) दुपारी दोन च्या सुमारास पेठकिल्ला शिवलकरवाडी, लोहार गल्ली येथील झाडी-झुडपाच्या आडोशाला निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित झाडी-झुडपाच्या आडोशाला विनापरवाना मटका जुगार चालवत असताना निदर्शनास आला. पोलिसांनी त्याच्याकडून साहित्यासह ८१५ रुपये जप्त केले. या प्रकरणी पोलिस हवालदार कुशल हातिसकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.