रस्त्यात दुचाकी पार्क करुन वाहतूकीस अडथळा; स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर दुचाकी वाहतूकी अडथळा होईल अशी पार्क करणाऱ्या प्रौढाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. गुळ मोहम्मद अशमोहम्मद शहा (वय ५६, रा. पावसरोड, गोळपपुल, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १९) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पावस-गोळपपुल येथील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुळ मोहम्मद शहा याने पावस-गोळप येथील सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी (क्र. एमएच.०८ ए २०६८) ही रस्त्यावरुन येणा-या जाणाऱ्या वाहतूकीस धोका होईल अशा स्थितीत उभी केली होती. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार महेश मुरकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.