गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल भिंतीलगत एका बंद टपरीच्या आडोशाला अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश संतोष कदम (वय ३१, रा. साईसुनंदा अपार्टमेंट, शांतिनगर, रत्नागिरी) असे संशयित गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१८) दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या भिंतीलगत एका बंद टपरीच्या आडोशाला निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करताना आढळला. या प्रकरणी पोलिस हवालदार आशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.