रत्नागिरी:- शिरगाव ते साखरतर रोडवर, शिरगाव मुस्लीमवाडा येथील मुजावर किराणा दुकानासमोर १३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फैसल दाऊद मुजावर (वय ४०, रा. शिरगाव, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोकॉ/७०२ विजय अशोक आंब्रे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी फैसल मुजावर याने आपल्या ताब्यातील (एम.एच.०२/बी.जे.३७३२) ही गाडी रस्त्यात रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली होती. रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५ (३) नुसार नोटीस देण्यात आली आहे.