रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारुबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ जुलै रोजी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
रत्नागिरी शहरात जोशीला वाईन मार्टजवळ १० जुलै रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास जोशीला वाईन मार्टच्या शेजारी लंडन पिल्सनर स्ट्रॉन्ग बिअर पित असताना अमित दिलीप नागवेकर, चैतन्य प्रशांत घुडे, अनिकेत राजेंद्र नागवेकर आणि प्रतिक राधाकिशन पिल्ले यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जयगड भंडारपुळे ते गणपतीपुळे रस्त्यावर ११ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भंडारपुळे ते गणपतीपुळे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या उजव्या बाजूला हॅलीपॅड शेजारी झुडपाखाली जयेंद्र राजाराम रामाणे (वय ४४, रा. भंडारपुळे) हा देशी दारू पिण्याचे लायसन्स नसताना लंडन पिल्सनर नावाची दारू पित असताना मिळून आला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.