रोहयोतून जिल्ह्यात ११२ सिंचन विहिरी

रत्नागिरी:- चालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात ११२ सिंचन विहिरींची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी ४ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एका विहिरीसाठी ४ लाख रुपये खर्च करण्यात येतो.

४० टक्के कुशल आणि ६० टक्के अकुशल रक्कम विहिरीसाठी खर्च करण्यात येते. रोजगार हमी योजनेतील मजुरांसाठी ६० टक्के म्हणजे २ लाख ४० हजार इतकी दर आठवड्याला संबंधित मजुरांच्या बँक खात्यावर कामाच्या मोबदल्यात जमा करण्यात येते. ही रक्कम पूर्ण होईपर्यंत मजुरांना या कामाची मजुरी दिली जाते. उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याला दिली जाते. जिल्ह्यात ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. यातून मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे.